Case Against Kohli : विराट कोहलीला अटक करा; मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल

0

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला अटक करण्यात यावी अशी एक याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ऑनलाइन जुगाराची जाहिरात हे दोनही अभिनेते करत असून अशा प्रकारांनी जुगाराला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं या याचिकेत म्हटले आहे.

विराट कोहली सोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना हिला सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

चेन्नई मधील एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. विराट कोहली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये या अ‍ॅपचे व्यसन वाढत चालले आहे. त्यामुळे या ऑनलाईन जुगार खेळण्याच्या सर्वच अ‍ॅपवर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे.

विराट कोहली, तमन्ना या सेलिब्रिटी लोकांनी अशा प्रकारच्या मोबाईल अ‍ॅप्सची जाहीरात करून तरूणांची दिशाभूल करत आहेत. वकिलाने एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला देत त्याने ऑनलाईन झुगारा साठी उसने घेतलेले पैसे परत करू न शकल्याने आत्महत्या केल्याचे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ऑनलाइन जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या या दोन्ही सेलिब्रिटींना अटक करावी असे याचिकाकर्त्या वकिलाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like