Hinjawadi : जागेवर बेकायदेशीररित्या ताबा घेतल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल

Case filed against 16 persons for illegal possession of premises.

एमपीसी न्यूज – जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन अतिक्रमण केल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथे घडला आहे.

मोरेश्वर घरे आणि त्याचे 10 ते 15 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबत योगेश वसंत वाणी (वय 44, रा. पिंपरी) यांनी सोमवारी (दि. 9) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची हिंजवडी येथे जमीन आहे. त्या जमिनीवर त्यांनी कंपाउंड केलेले आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या जागेत अतिक्रमण करून कंपाउंड तोडले. तिथे पत्र्याचे शेड उभारले.

यासाठी जागेच्या सुरक्षा रक्षकाने आरोपींना अडवले असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तसेच एका सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी मोरेश्वर घारे यांना गैरमार्गाने मदत करून फिर्यादी यांच्या जागेचा बेकायदेशीरपणे ताबा घेण्यास प्रवृत्त केले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III