Chinchwad : टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 174 जणांवर पोलिसांकडून कारवाई

Case filed against 174 persons for violating lockdown rules.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे पालन न करणा-या 174 जणांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना टाळेबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, याकडे नागरीक सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 10) 174  जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. अनुचित प्रकार दिसताच त्याच्यावर कारवाई केली जात आहे.

जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस आणि प्रशासन हरत-हेने प्रयत्न करीत आहेत.

सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (47), भोसरी (9), पिंपरी (18), चिंचवड (14), निगडी (9), आळंदी (0), चाकण (3), दिघी (14), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (9), वाकड (12), हिंजवडी (0), देहूरोड (4), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (23), चिखली (1), रावेत चौकी (5), शिरगाव चौकी (2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.