Dehuroad : परवानगीशिवाय सासूच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या सुनेसह आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सासूच्या मृत्युनंतर डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा स्मशान दाखला न घेता सासूचे मृतदेहाचे दहन केले. याबाबत सुनेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) शिवाजीनगर, देहूरोड येथे घडली.

शोभा शंकर शिंदे (वय 40, रा. शिवाजीनगर, देहूरोड),पंकज गोपाळराव तंतरपाळे, रेव सोलोमोनराज भंडारे, राजू मारीमुत्तू, गोविंद मंचल आणि स्मशानभूमीतील तीन वॉचमन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद रफी अल्लाउद्दीन सय्यद (वय 54, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शोभा शिंदे यांची सासु गंगुबाई बबन शिंदे (वय 82) यांचा शिवाजीनगर, देहूरोड येथे राहत्या घरी आजारपणा आणि वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी नियमानुसार डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड यांच्याकडून स्मशान दाखला मिळवून रीतसर अंत्यविधी करणे अपेक्षित होते. मात्र शिंदे यांनी वॉर्डातील एका नगरसेवकाचा मुलगा आणि अन्य काही जणांच्या मदतीने सासूचा अंत्यविधी केला. दरम्यान  स्मशानभूमीतील वॉचमनने मयताचा स्मशान दाखला न पाहता त्यांना स्मशानभूमीत प्रवेश दिला.

या प्रकारामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूचे कारण माहिती न करता मृतदेहाची विल्हेवाट लावली. याबाबत सुरुवातीला देहूरोड पोलीस ठाण्यात अकस्मात  मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय दंडविधान कलम 188, 297 आणि 201 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1