Talegaon : विनाकारण पत्नीला मारहाण करणा-या पतीवर गुन्हा

Case filed against a husband who beat his wife for no reason.

एमपीसी न्यूज – घरात बसलेल्या पत्नीला विनाकारण पतीने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी जखमी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 20) दुपारी एक वाजता घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ, बौद्ध वस्ती, तळेगाव दाभाडे येथे घडली. याबाबत पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनीता राजेंद्र खरटमल (वय 31, रा. घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ, बौद्ध वस्ती, तळेगाव दाभाडे) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र भगवान खरटमल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनीता मंगळवारी दुपारी त्यांच्या घरी बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी पतीने त्यांना काहीही कारण नसताना शिवीगाळ व दमदाटी केली.

तसेच लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सुनीता यांच्या डोक्यात दुखापत झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.