Bhosari : श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेऊन ठार मारणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – श्वानाला दुचाकीला बांधून फरफटत नेले. यात गंभीर जखमी होऊन त्या श्वानाचा मृत्यू झाला. याबाबत फरफटत नेणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 5) सकाळी कासारवाडी येथे घडली.

बंटी फुगे (वय 25, रा. कासारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास आरोपी बंटी याने कासारवाडी परिसरात भटकत राहणाऱ्या श्वानाचा गळ्यात नायलॉन आणि कापडी दोरी बांधून त्याला दुचाकीच्या मागे बांधले. त्या श्वानाला दुचाकीला बांधून कासारवाडी स्मशानभूमी पासून ते किनारा हॉटेलपर्यंत ओढत फरफटत नेले.
रस्त्यावरून फरफटल्यामुळे गंभीर जखमी होऊन श्वानाचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.