Pimpri : लॉकडाऊनमध्येही बिअर शॉपी सुरू ठेवणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात बिअर शॉपी सुरू ठेवली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी भाजी मंडई येथे शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी घडली.

धनराज रामचंद्र सुरेजा (वय 55, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) आणि लखन मोहन रख्यानी (वय 34, रा. रमाबाई नगर, लिंक रोड, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी राजाराम मारूती काकडे (वय 49) यांनी शनिवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आपसांत संगनमत करून पिंपरी भाजी मंडई येथील निक्‍की बिअर शॉपी हे दुकान शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास सुरू ठेवले. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संचारबंदीचे आदेश असतानाही आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन केले. आरोपींकडून 40 हजार 428 रुपयांच्या 483 दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.