Pimpri : बाप-लेकाकडून 20 लाखांच्या कपड्यांचा अपहार

एमपीसी न्यूज – पतीच्या निधनानंतर भाड्याच्या दुकानातील मुळ मालकाने 20 लाखांच्या कपड्यांचा अपहार केला. हा प्रकार 16 जून ते 14 डिसेंबर या कालावधीत पिंपरी बाजार पेठेत घडला.

इशा पवन चावला (वय 36, रा. साई इमराल्ड सोसायटी, विजयनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिलीप भुलचंद अथवानी (वय 57), रितेश दिलीप अथवानी (वय 36, दोघे रा. पिंपरी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे पिंपरी बाजार पेठेत युनिटी कलेक्‍शन नावाचे कपड्याचे दुकान होते. हे दुकान आरोपींकडून भाड्याने घेतले होते. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी महिलेचा व तिच्या पतीचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. तर फिर्यादी याही गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर फिर्यादी यांनी दुकानातील कपड्यासंदर्भात आरोपींकडे विचारणा केली. आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. याबाबत चौकशी केली असता आरोपींनी 20 लाख रूपयांचे कपडे विकून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.