Moshi : गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करणाऱ्या दारुड्या पती विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – गाडी घेण्यासाठी तसेच घरातील रोजच्या खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणाऱ्या दारुड्या पतीविरोधात पत्नीने गुन्हा नोंदवला. ही घटना मोशी येथे घडली.

गणेश लहू राठोड (वय 34, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या दारुड्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश राठोड याला दारूचे व्यसन आहे. तो काही काम धंदा करत नाही. मागील एक वर्षापासून गणेश दररोज दारू पिऊन फिर्यादी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण करत होता. तसेच त्याने गाडी घेण्यासाठी व घरातील रोजच्या खर्चासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी महिलेकडे केली. पीडित महिलेने यासाठी नकार दिला असता गणेश याने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने थेट पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.