Sangvi : वासराला बेदम मारहाण करणाऱ्या मालकावर गुन्हा

Case filed against owner who beat the calf in Sangvi area.

एमपीसी न्यूज – 15 दिवसांच्या वासराला मालकाने बेदम मारहाण केली. हा प्रकार नवी सांगवी परिसरात घडला असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारे एका प्राणी मित्राने वासराच्या मालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

प्राणी मित्र स्वप्नील पुष्कराज जोशी (वय 25, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बाळासाहेब बाजीराव वाळुंज (वय 62, रा. नवी सांगवी) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब याने स्वतःच्या मालकीच्या गायीच्या अवघ्या 15 दिवसांच्या वासराला दोरी आणि हाताने बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार 20 जुलै ते 22 जुलै रोजी रात्री साडेनऊ या कालावधीत घडला आहे.

प्राणीमित्र स्वप्नील जोशी यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरुन आणि संबंधित व्हिडिओवरुन बाळासाहेब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा अधिनियम संबंधीचा कायदा 1969 कलम 11 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.