22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Kiran Dighe :  शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्याविरोधात मुंबईत बलात्कार पीडितेला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर त्यांचा मित्र रोहित कपूर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वीच केदार शिंदे (Kiran Dighe) यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली होती.

 

काय आहे प्रकरण

 

मुंबईतील ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका 23 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला या खासगी कंपनीत क्लब अम्बेसिटर म्हणून काम करतात. मुंबईत येणारे पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने 28  जुलै रोजी सेंट रेजीस हॉटेलमध्ये मेंबरशीप घेण्याच्या बहाण्याने जेवणासाठी बोलावले होते.त्यानंतर क्लब मेंबरशीपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगितले. त्यानंतर रोहित कपूरने बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित (Kiran Dighe) महीलेने दिली आहे.

 

या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र त्यानंतर महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र त्यानंतर 31 जुलै रोजी पीडित महिलेने आपल्यावर बेतलेला प्रसंग तीन मित्रांना सांगितला. पीडितेने रोहित कपूरला व्हॅटस्अपवर याबाबत जाब विचारला. रोहित कपूरने पीडित महिलेचे व्हॅटस्अप बंद केले.

 

 

 

केदार दिघे यांचा काय संबंध

त्यानंतर एक ऑगस्ट रोजी पीडित महिलेने आपल्या मित्रांमार्फत आरोपीला विचारणा केली. मात्र आरोपी रोहित कपूरने त्याचा मित्र केदार दिघे याच्या मध्यस्थीने पैसे घेऊन या घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. या नकारानंतर केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता तक्रारदार महिलेने दिलेल्या जबाबावरुन ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपी रोहित कपूर व केदार दिघे यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

spot_img
Latest news
Related news