Sangvi : बांधकाम साइटवर जाण्यासाठी अटकाव करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Case filed against two who prevented the Builder from visiting the construction site.

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवर जाण्यासाठी अटकाव करत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 मे रोजी सकाळी पिंपळे गुरव येथे घडली.

किशोर शंकर गावरे (वय 33, रा. नागरस रोड, औंध) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सखाराम हरीभाऊ काशीद, सुहास काशीद (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावरे यांची पिंपळे गुरव मधील गजू हॉटेल समोर कल्पतरू सोसायटी शेजारी बांधकाम साईट सुरू आहे. त्या साइटवर जात असताना आरोपींनी गावरे यांना अटकाव केला.

आरोपी सखाराम फिर्यादी यांना पाय काढण्याची धमकी देऊन अंगावर धावून गेला. तर आरोपी सुहास याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like