Lonavala: बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Case filed for renting a bungalow in Lonavala amid corona virus pandemic.

एमपीसी न्यूज – तुंगार्ली गोल्ड व्हॅली परिसरात विनापास धारक व्यक्तींना बंगला भाड्याने दिल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी एका बंगला मालकासह भाड्याने राहण्यासाठी आलेल्या नागरिकांवर भादंवि कलम 188 व 269 अन्वेय गुन्हा दाखल केला.

पोलीस काँन्स्टेबल पवन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निदा अनिफ अत्तारी (वय 24, रा. गोल्ड व्हॅली, तुंगार्ली लोणावळा) याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोल्ड व्हॅली सेक्टर डी मधील माउंट काॅटेज हा बंगला भाडे तत्वावर देण्यात आला होता. (एमएच 43 बीआर 3563) व (एमएच 43 बीआर 4410) या दोन रिक्षांमधून सात ते आठ जण वरील बंगल्यात विनापास राहण्यासाठी आले होते.

लोणावळा शहराचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम सांगळे, पोलीस काँन्स्टेबल पवन तायडे, पोलीस नाईक कदम, चालक होले हे सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रात्रगस्त घालत असताना वरील बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोणीही बंगले भाड्याने देऊ नये अशा सूचना लोणावळा शहर पोलीस व नगरपरिषद यांनी दिलेल्या असताना देखील काही ठिकाणी चोरून लपून बंगले भाड्याने दिली जात असल्याचे वरील कारवाई करून अधोरेखित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.