Pune : घरात दोष असल्याचे सांगून महिलेची 10 लाखांना फसवणूक

जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरात दोष असल्याचे सांगून विधी करण्याच्या बहाण्याने तीन अनोळखी इसमांनी महिलेची 10 लाखांना फसवणूक केली. ही घटना 16 एप्रिल 2018 ते 3 जुलै 2019 या कालावधीत घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा हांडेवाडी रोड हडपसर येथे फ्लॅट आहे. तुमच्या प्लॅटमध्ये दोष आहे असे सांगून तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी महिलेला घरातील किचमध्ये काळी बाहुली काढून त्यांना भिती दाखवली. तसेच हे दोष दूर करण्यासाठी एका उंटाचा बळी द्यावा लागेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 97 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

याप्रकरणी नरबळी जादुटोणा अधिनियम 2,3,4 यानुसार तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला असून कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.