Pune News : जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेवर बेकायदेशीरपणे ताबा मारून (Pune News) सिमेंटचे पोल, तारेचे कंपाउंड तोडून नुकसान केले. तसेच नावाचा बोर्ड काढून दुसरा बोर्ड लावला. हा प्रकार 23 फेब्रुवारी रोजी मारुंजी गाव येथे घडला.

 

भगवान सिंग चित्तोडिया, त्याची पत्नी, भाऊ आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण प्रकाश बुचडे (वय 38, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune News : खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या तीन गुंठे जागेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादीस शिवीगाळ करून गॅस कटर आणि जेसीबीने जागेला असलेले (Pune News) सिमेंट पोल आणि तारेचे कंपाउंड तोडून नुकसान केले. फिर्यादी यांच्या नावाचा बोर्ड आणि कंपाउंडच्या तारा काढून चोरून नेल्या. तिथे भगवानसिंग चित्तोडिया या नावाचा बोर्ड लावला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.