Chakan News : दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर व भांडणे सोडविण्या ऐवजी त्यात भर पाडणाऱ्य़ा सासू साऱ्यावर ही चांकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Chakan News) कऱण्यात आला आहे. हा प्रकार खेड येथील पाईट या गावी सोमवारी (दि.12) उशीरा घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पती सचीन सिताराम सोनवणे (वय 38), सासू व सासरे सिताराम केशव सोनवणे सर्व राहणार पाईट, खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : मिळकत कर विभागाची साडेआठ महिन्यांत ‘रेकॉर्ड ब्रेक’ वसुली, तिजोरीत 501 कोटी जमा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला आरोपी हे मागील आठ महिन्यापासून त्रास देत आहेत. सोमवारीही सचिन दारु पिऊन आला व त्याने किरकोळ कारणावरून फिर्यादी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे त्याने घरातील काठीने फिर्यादीला मारहाण कऱण्यात सुरुवात केली. (Chakan News) यावेळी सासू-सासऱ्यांनी भांडणे सोडविण्या ऐवजी सचिनला पुन्हा फिर्यादीला मारण्यास चिथावणी दिली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.