Pune News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके यांच्यासह 5-6 कार्यकर्त्यांवर (Pune News) मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलिस ठाण्यात भाजप चे कार्यकर्ते वासुदेव भोसले यांनी फिर्याद दिली आहे. पुणे शहरातील वारजे भागात गेल्या अनेक वर्षांपासून सचिन दोडके नगरसेवक आहेत.
Mumbai : माहिममधल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता वारजे भागात असलेल्या आर एम डी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे. (Pune News) त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे खासदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही काम चालू असलेल्या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यातच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. तिथे सुरू असलेल्या कामगारांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे
सचिन दोडेक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात.