Bhosari crime : महाविद्यालयीन तरूणीला पाठलाग करून त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महाविद्यालयात जाताना किंवा घरी जाताना सतत पाठलाग करून त्रास देणऱ्या रोड रोमिओवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Bhosari crime) हा प्रकार 2019 ते मंगळवारी (दि.20) म्हणजे सुमारे दोन वर्षापासून सुरु होता.

तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार अजिंक्य विजय उपाडे (रा. शांतीनगर भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Bharat Jodo : ‘भारत जोडो’ अभियानाला पाठिंब्यासाठी पुण्यात पदयात्रा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा ओळखीचा असून तो फिर्यादी यांना तु मला आवडतेस माझ्याबरोबर गाडीवर बस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलून घरापासून महाविद्यालयापर्यंत पाठलाग करायचा. फोनवरूनही बोलून तो फिर्यादी यांना सतत त्रास द्यायचा.(Bhosari crime) 17 सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या आई त्यांना घेऊन परिक्षेसाठी गेल्या असता पेपर सुटताच फिर्यादी घरी जात असताना फिर्यादी यांचा हात पकडून तू मला आवडतेस, तु माझीच आहेस म्हणत त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच तुला व तुझ्या आईला बघून घेईन म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.