Bhosari : बनावट पार्ट कंपनीच्या नावे विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बनावट पार्ट कंपनीच्या नावे विकणाऱ्या एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदाराकडून एक लाख तीन हजारांचे बनावट पार्ट जप्त करण्यात आले आहेत.(Bhosari) ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी जय गणेश साम्राज्य कॉम्प्लेक्स भोसरी येथे करण्यात आली.

गणेश तुकाराम गायकवाड (वय 32, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रेवणनाथ केकान (वय 40, रा. हडपसर, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Municipal Elections : सुनावणी पुन्हा लांबणीवर, आता 10 एप्रिलला सुनावणी; पावसाळ्यानंतरच निवडणूक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड यांनी त्यांच्या दुकानात हुंदाई कंपनीचे स्वामित्व असलेल्या स्पेअर पार्टचे छपाई, होलोग्राम, एमआरपी स्टीकर आदी हुबेहूब बनावट (Bhosari) पार्टला लाऊन त्याची विक्री केली. पोलिसांनी एक लाख तीन हजार 685 रुपये किमतीचे 296 बनावट स्पेअर पार्ट जप्त केले आहेत. याप्रकरणी फसवणूक आणि कॉपीराईट अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.