Pune News : महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेचा पाठलाग केला.(Pune News) तिची बदनामी करण्यासाठी चिठ्ठी लिहून ती कारच्या काचेवर चिकटवली. हा प्रकार गुरुवारी (दि. 17) सकाळी कासारसाई येथे घडला.

याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीकांत रामदास कुंभार (वय 22, रा. कासारसाई, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple saudagar News : ट्रॅव्हलरच्या धडकेत बुलेटचे नुकसान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी शी जवळीक साधण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या कारवर त्यांची बदनामी (Pune News) करणारा मजकूर लिहून चिठ्ठी काचेवर चिकटवली. फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेणारा मजकूर त्यात होता. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.