Pune : ‘किकी चॅलेंज’ करणा-यांविरोधात मोटार व्हेईकल अॅक्टनुसार गुन्हा – उपायुक्त अशोक मोराळे

एमपीसी न्यूज – जगभरात सध्या किकी चॅलेंजने धुमाकूळ घातला आहे. धावत्या गाडीतून उतरुन ‘किकी डू यू लव्ह मी? या गाण्यावर नाचत नाचत पुढे जाणे, असे या चॅलेंजचे स्वरूप आहे. जगभरातील तरुणाईचे किकी चॅलेंज करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किकी चॅलेंज करताना काहीजणांचा अपघातही झाला आहे. त्यामुळेच ‘किकी चॅलेंज’ करणा-यांविरोधात मोटर व्हेईकल अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

मोराळे म्हणाले, ‘किकी चॅलेंज’ हा प्रकार अतिशय धोकादायक आणि जीवघेणा आहे. असे करताना स्वत:सह इतरांच्या प्राणावरही बेतू शकते. त्यामुळे असा प्रकार करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांच्यावर मोटार व्हेईकल अॅक्टनुसार रॅश ड्रायव्हींग करणे आणि निष्काळजीपूर्वक गाडी चालविणे यानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.