Pune News : लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केल्याप्रकरणी पुण्यातील 33 व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत आंदोलन करणाऱ्या पुण्यातील 33 व्यापाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात दिवसा जमाव बंदी असतानाही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी शहरातील व्यापारी संघटनांनी लक्ष्मी रस्त्यावर गुरुवारी आंदोलन केले होते.

त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्यासह 33 व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन व साथरोग अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी साकुरी महापालिका प्रशासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत पुणे शहरासाठी काही नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार शहरातील जीवनावश्यक जीवनावश्‍यक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

परंतु हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने व्यापारी एकत्र जमले होते. व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले त्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

 आता सोमवारी दुकान उघडणार

दरम्यान व्यापाऱ्यांनी आज कुठल्याही परिस्थितीत दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु हा निर्णय मागे घेण्यात आला असून सोमवारपासून दुकाने उघडण्यात येतील असे फेडरेशन ऑफ ट्रेड ऑफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.