Ravet : किराणा दुकान फोडून रोख रकमेची चोरी

एमपीसी न्यूज – किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी शिंदे वस्ती, रावेत येथे उघडकीस आली.

सचिन शशिकांत झरकर (वय 40, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांचे रावेत येथील शिंदेवस्ती मध्ये नारायणी शॉपिंग मॉल नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी रात्री दहा वाजता दुकान कुलूप लावून बंद केले.

अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून आठ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच दुसऱ्या ठिकाणी चोरी करून सहा हजार रुपये चोरून नेले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.