Pune News : आरोपी पकडा आणि बक्षीस मिळवा ; पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना

एमपीसी न्यूज : शहर परिसरात गेल्या काही दिवसात कोयता गँगने धूमाकुळ घातला असून फायरींगच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. (Pune News) शहरात गुंडाचा वाढता धूमाकुळ पाहता पोलिसांसमोर आव्हान उभे राहीले असून या गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवर आता बक्षीसांची खैरात करण्यात आली आहे.

यानुसार पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसे देण्यात येणार असून पुणे पोलिसांची ही बक्षीस योजना चांगलीच चर्चेत आली आहे.

MPC News Podcast 02 February 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पुणे पोलीस आयुक्तालयातील पश्चिम आणि पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी ही बक्षीस योजना जाहीर केली आहे.

कोयता गॅंग वाढती गुन्हेगारी थांबवण्याच्या या पार्श्वभूमीवर आता सराईतांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. (Pune News) पुणे पोलिसांनी बक्षीस योजना जाहीर केली असून आरोपींना पकडणार्‍या कर्मचार्‍यांवर बक्षीसांची खैरात केली जाणार आहे.

 

– शस्त्र अधिनियम कलम 3, 25  दहा हजार रुपये

– शस्त्र अधिनियम कलम 4, 25  तीन हजार रुपये

– फरारी आरोपीस पकडणे 10 हजार रुपये

– पाहीजे आरोपीस पकडणे 5 हजार रुपये

– मोक्कातील आरोपी पकडणे  5 हजार रुपये

– एमपीडीएतील आरोपी पकडणे  5 हजार रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.