Pune : मांजरी-महादेवनगर भागातील पाणीप्रश्न सोडविणार – वसंत मोरे

एमपीसी न्यूज – मांजरी – महादेवनगर भागातील पाणीप्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मनसेचे हडपसर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दिले.

या भागात फिरत असताना मागील 5 वर्षांत स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही. अद्यापही लोक दारात भांडी घेऊन पाण्याची वाट बघतात. आमदार झाल्यावर 2 वर्षांतच या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणार असल्याचेही मोरे म्हणाले. भिकेचे नव्हे तर हक्काचे पाणी या जनतेला मिळवून देणार आहे. या भागात पाण्याचा प्रश्न तीव्र आहे.

_MPC_DIR_MPU_II

सत्ताधाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. बीटी कवडे रोड, साडेसतरानळी, मुंढवा – केशवनगर या भागात आज वसंत मोरे यांची पदयात्रा काढण्यात आली.  त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या पदयात्रेत मनसेचे नेते बाबू वागस्कार, माधवराव मोघे सहभागी झाले होते. वसंत मोरे 100 टक्के आमदार होणार, मुंढवा – केशवनगरचे वातावरण फिरले. यावेळी फक्त मनसेला मत, मनसेचा विजय असो म्हणत ध्वज उंचावण्यात आले. या पदयात्रेत महिलांचाही मोठा सहभाग होता. तरुणांनी उत्साहात वसंत मोरे यांचे स्वागत केले.

सर्वांगीण, सुंदर, हेवा वाटावा असा हडपसर मतदारसंघ घडवायचा आहे. या भागात वाहतूक, पाणी, कचऱ्याची समस्या गंभीर आहे. ती सोडविण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. सध्या आमच्या पक्षाचे केवळ 2 नगरसेवक आहेत. तरीही आम्ही 160 नगरसेवकांना वाकवतो. येत्या 21 ऑक्टोबरला रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून भरघोस मातांनी विजयी करण्याचे आवाहन वसंत मोरे यांनी केले. कात्रज, कोंढवा, मुंढवा, हडपसर, साडेसतरानळी, महमदवाडी, अशा सर्वच भागातून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी महिला औक्षण करीत आहे. कोंढवा भागात आमचे नगरसेवक साईनाथ बाबर आणि माजी नगरसेविका आरती बाबर यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे मनसेचा विजय निश्चित असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.