CBI News: ‘कॅंब्रिज ॲनालिटीका’ विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: सीबीआयने (CBI) कॅंब्रिज ॲनालिटीका (Cambridge Analytica) या प्रसिद्ध कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. कॅंब्रिज ॲनालिटीकाने फेसबूकमधून (Facebook) 5.62 लाख भारतीय वापरकर्त्यांचा डेटा चोरल्याच्या आरोपाखाली सीबीआयने ही कारवाई केली आहे.

कॅंब्रिज ॲनालिटीका ही ब्रिटनमधील कंपनी असून लोकांच्या खासगी माहितीचं विश्लेषण करणं व त्याचा हवा तसा वापर करणे यामुळे सुरवातीपासूनच ही कंपनी वादाच्या भोव-यात अडकली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद (Ravi shankar Prasad) यांनी सांगितले आहे. फेसबुकवरील भारतीयांचा डाटा कंपनीने चुकीच्या मार्गाने जमा केला असून त्याचा वापर भारतातील निवडणुकींना (Election)  प्रभावित करण्यासाठी केला गेल्याचा आरोप केंब्रिज ॲनालिटीकावर होत आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने) Central criminal Investigation Department) कॅंब्रिज ॲनालिटीका आणि ग्लोबल सायन्स रीसर्च या दोन कंपन्यांच्या विरोधात प्राथमिक तपास सुरू केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.