Mumbai News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयचे छापे

​एमपीसी न्यूज :  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) मार्फत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच सीबीआयच्या टीमने अनेक ठिकाणी धाडसत्रही सुरू केल्याची माहिती आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर झाल्यानंतरच सीबीआयमार्फत ्निल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या दिल्लीतील पोलिस अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या टीमने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सलग ९ तास चौकशी केली होती.

महाविकास आघाडी सरकारच्या माझी मंत्र्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे या संपुर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा सेटबॕक असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. सीबीआयच्या टीमने अनेक ठिकाणी धाडसत्रही सुरू केल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

सीबीआय़च्या टीमने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईथ अनेक ठिकाणी छापे टाकायलाही सुरूवात केली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमुळे अनिल देशमुख यांच्या संकटात आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. सीबीआयने या संपुर्ण प्रकरणात सचिन वाझे आणि परबीर सिंह यांच्या चौकशीसाठीही नॅशनल एनवेस्टीगेशन एजन्सी (एनआयए) कोर्टाकडे वेळ मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी चौकशी होणार असल्याचे कळतेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.