Mumbai News: ‘संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची सीबीआयने नार्को टेस्ट करावी’ – भाजपची मागणी

'CBI should conduct narco test on Sanjay Raut and Aditya Thackeray', demands BJP spokeperson Nikhil Aanand.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. या प्रकरणात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सीबीआयने नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपाने केली आहे. महाराष्ट्र सरकार सुशांत सिंग राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे,  असा सवाल भाजपचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडत भाजपा, सुशांत सिंग राजपूत कुटुंब, सीबीआय यांच्यावर भाष्य केले होते. त्यानंतर भाजपानेही शिवसेनेवर पलटवार केला आहे.

सुशांत प्रकरणात काँग्रेसने मौन सोडले पाहिजे. महाराष्ट्र सरकार घाणेरडे राजकारण करत आहे. फक्त आदित्यच नव्हे तर या प्रकरणात वस्तुस्थितीशी छेडछाड केली जात आहे, पुरावे मिटवले जात आहेत.

सीबीआयने या सर्व बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.

‘सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहित असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून हे रहस्य समोर येईल, असे भाजप प्रवक्ते निखील आनंद यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.