CBSE 12th Result: सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर

CBSE 12th Result Announced दरवर्षी निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाते आणि गुणवत्ता धारकांची यादी जाहीर केली जाते.

एमपीसी न्यूज- सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाकडून पत्रकार परिषद घेतली जाते आणि गुणवत्ता धारकांची यादी जाहीर केली जाते. मात्र यावेळी कोरोना साथीमुळे सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल थेट वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.

असा पहा आपला निकाल

CBSE च्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी http://cbseresults.nic.in/cbse2020_ASPNET/Result/Class12.aspx या साईटवर गेल्यावर त्यांना रोल नंबर, स्कूल नंबर, सेंटर नंबर आणि अ‍ॅडमिट कार्ड आयडी तसेच सिक्युरिटी कॅप्चा कोड ही माहिती भरायची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.