CBSE Exam : सीबीएससी दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

एमपीसी न्यूज – सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशनच्या (CBSE) इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 11 जून या दरम्यान होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी 2 फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील असं सांगितलं होत. त्यानुसार आज वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.

या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा या मार्चमध्ये घेण्यात येतील. त्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे.

cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी अशा दोन पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. ती माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.