CBSE Exams : फेब्रुवारीपर्यंत 10 वी 12 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा होणार नाही – केंद्रीय शिक्षणमंत्री

एमपीसी न्यूज – दहावी बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा येत्या फेब्रुवारीपर्यंत घेतल्या जाणार नसल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी दिली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. पोखरीयाल यांनी देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनीमय केल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल.

परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे पोखरीयाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.