CBSE Result : मामासाहेब खांडगे स्कूलचा शंभर टक्के निकाल !

One hundred percent result of Mamasaheb Khandge school !

एमपीसी न्यूज –  मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही या शाळेने शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. विशाखा यादव, अक्षय पिलकवाल, सौरभ  दास, आकाश मंडल या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला.

सीबीएसई बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या 2019- 2020 या वर्षीच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही मामासाहेब खांडगे शाळेने  शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून आठ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत, तर दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दुस-या वर्षी देखील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या शाळेतील विशाखा यादव हिने 87% गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, अक्षय पिलकवाल याने 84 % गुण मिळवून द्वितीय, सौरभ दास याने 83.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक, तर आकाश मंडलने 81.80% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.

शाळेचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे व व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्वच शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.