CBSE X Result : प्रतीक्षा संपली! सीबीएसई दहावीचा निकाल उद्या

CBSE X Result: The wait is over! CBSE X results tomorrow केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे.

एमपीसी न्यूज- सीबीएसई दहावीचा निकाल उद्या (दि.15) जाहीर होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ निर्माण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्यांच्या या ट्विटरवरील घोषणेने सीबीएसई दहावीचा निकाल कधी लागणार याविषयीची प्रतीक्षा संपली आहे.

सीबीएसईचा बारावीचा निकाल सोमवारी (दि.14) जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी उत्सुकता होती. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे 15 जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित होते.

त्यामुळेच कालपासून दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या. सीबीएसईचा दहावीचा निकालाची तारीख स्वतः केंद्रीय मंत्र्यांनीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना उद्या निकाल हातात पडण्याची प्रतीक्षा आहे.

येथे पाहा आपला निकाल

सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर दहावीच्या निकाल पाहण्याच्या लिंकवर क्लिक करा. ही लिंक नव्या टॅबमध्ये ओपन होईल किंवा नव्या पेजवर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल.

या नव्या पेजवर तुम्हाला निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांक, शाळा क्रमांक, केंद्र क्रमांक आणि हॉल तिकीट आयडी भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल उपलब्ध होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.