Pune : बाजीराव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वाहनाने दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणास जबर धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना बाजीराव रस्त्यावरील गणराज हॉटेलजवळ रविवारी ( २८ ऑक्टोबर ) सकाळी आठ वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

ऋतिक प्रमोद लाडगावकर (वय 18, रा. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋतिक हा त्याच्या पल्सर मोटारीवरुन येत होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एका वाहनाने त्यास जोरात धडक दिली. दुचाकीला धडक जोरात बसल्याने ऋतिक खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. दरम्यान त्यास उपचारासाठी तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.

दरम्यान या घटनेनंतर अपघात करणारा अनोळखी वाहनचालक जखमी तरुणास मदत न करता पळून गेला. अपघात नेमका कसा झाला, याविषयी पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक केसरकर, पोलिस कर्मचारी महावीर ढावणे तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.