Pune : व्हीपीएसमध्ये मातृदिन उत्सहात साजरा

एमपीसी न्यूज – अनेक वर्षांची परंपरा कायम राखत व्ही. पी.एस. हायस्कूल स्काऊट आणि गाईड विभागातर्फे मातृदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थांनी स्व -हस्ते आपल्या मातांना पत्र लिहून पोस्टाद्वारे पाठवून मातांविषयी कृतज्ञता व्यक्त  केली. तसेच माता-पित्याचे पूजन करण्यात आले. यावेळी किर्ती कळमकर, प्रज्ञा कांबळे, दिया पडवळ या विद्यार्थीनींनी मनोगत सादर करताना हृदयाला पाझर फोडला. याच वेळी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

प्राचार्य संजीव रत्नपारखी, उपमुखाध्यापक विजयकुमार जोरी, पर्यवेक्षक दादाभाऊ कासार, पर्यवेक्षिका उज्ज्वला पिंगळे, संजीवनी आंबेकर व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमांचे नियोजन आणि सूत्रसंचालन संजय पालवे तर आभार सुरेखा परदेशी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2