Pimpri : अरविंद एज्युकेशन सोसायटीत राजभाषा हिंदी दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश / मराठी मीडियम स्कूलमध्ये राजभाषा हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका हर्षा बाठिया उपस्थित होत्या. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, तेजल कोळसे-पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी तिसरीतील विद्यार्थ्यांनी स्वर आणि व्यंजन यापासून शब्द कसा तयार होतो, याची प्रात्यक्षिके दाखविली. विद्यार्थ्यांनी ‘विविधतेत एकता’ या विषयावर आधारित नाटिका सादर केली. हिंदी विषयाच्या शिक्षिका जयश्री गुरव, वृषाली कोकणे, स्वाती गाडे, हेमाली जगदाळे यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले. पाचवीतील सायली सात्रस हिने ‘स्त्री’ विषयावर हिंदी कविता सादर केली. तर हेमंत पाटील या विद्यार्थ्याने माजी पंतप्रधान यांची एक कवी म्हणून ओळख करून देत वाजपेयी यांची एक कविता सादर करीत वातावरण भारावून टाकले.

स्वच्छता अभियानावर आधारित आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. हिंदी सिनेमातील डायलॉग सुमित ढमढेरे व अभिषेक मुळखेडेे या विद्यार्थ्यांनी सादर केले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी हिंदी गाण्यांवर अंताक्षरी घेण्यात आली. यावेळी शिक्षिका सुषमा शिरावले व शिक्षक जीवन सोळंकी यांनी हिंदी गाणे गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढविली.

मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना हिंदी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. हिंदी भाषा ही राजभाषा असून विविध राज्यांमधील संवाद साधण्याची ती एक मुख्य भाषा आहे. कोणत्याही भाषेला कमी न लेखण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गुरव, आस्था पटेल, प्रेम वाटोळे या विद्यार्थ्यानी; तर आभार शिक्षिका मुक्ता उपाध्याय व शीतल चव्हाण यांनी मानले. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.