Talegoan : खांडगे स्कूलमध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा  

एमपीसी न्यूज – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे करिअर मार्गदर्शक प्रा.विजय नवले यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यानंतर सहावीतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
सार्थक भांडवलकर या विद्यार्थ्याने शिक्षक दिनाविषयी माहिती दिली. तर आकाश मंडल या विद्यार्थ्याने शिक्षकांसाठी कौतुकास्पद अशी कविता सादर केली.  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

“विद्यार्थी शिक्षकांना आदर्श मानत असतो. त्यामुळे तन्मयतेने शिकविणारे शिक्षक,  विषयासोबतच आयुष्याची दिशा देणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ममतेने वागवितानाच शिस्तीचा  आग्रह धरणारे शिक्षक यांना विद्यार्थी आयुष्यभर स्मरणात ठेवतात. शिक्षकांनी वाचनावर भर दिला पाहिजे. आपण सर्व शिक्षक एका उदात्त क्षेत्रात काम करत आहोत,” असे मार्गदर्शन प्रा. विजय नवले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.