Pune : प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा १६ वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – प्रेमनगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा 16 वा वर्धापन नुकताच साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यंग चित्रकार शी. द. फडनीस होते. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू तथा राजदत्त सुप्रसिद्ध छायाचित्रकार रफीद शेख अमीर, सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री सुहासिनी देशपांडे आणि सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री जयमाला इनामदार व नगरसेवक प्रवीण चोरबेले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अनघा राजवाडे यांच्या दृक-श्राव्य गाण्याच्या कार्यक्रमाने झाली. तंत्र सहाय्य रमेश दिवेचा व प्रकाश पोरवाल याचे होते. दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजन व गणेश पूजन मान्यवर आणि संघाचे कार्यकर्ते यांनी केली. यावेळी सर्व मान्यवरांचा सदाबहार जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विवाहाला 50 वर्ष झालेल्या दाम्पत्यांचा तसेच वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार, आदर्श कार्यकर्ता, कार्यकर्ता पुरस्कार तसेच आदर्श स्नुषा पुरस्कार देण्यात आले.

नगरसेवक व अध्यक्ष बिबेवाडी प्रभाग समिती प्रवीण चोरबेले यांच्या मातृ पितृ प्रतिष्ठानद्वारा पुरस्कृत” आदर्श माता पिता पुरस्कार 2020 श्रीरंग दगडे व सिंधू दगडे यांना प्रदान करण्यात आला. सत्कारार्थी मान्यवर जुन्या काळात असलेले त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या जीवनगौरव पुरस्काराने ते भारावून गेले. त्यांची जाणीव दिवाळी गोष्टाची भावना त्यांनी व्यक्त केले.

स्नेहल दामले निवेदिका त्यांनी सर्व मान्यवरांची मुलाखत घेतली. मान्यवरांनी त्यांच्या जीवनातील काही अस्मरणीय प्रसंगाचे वर्णन केले. गाण्याच्या कार्यक्रमात पदावर मराठी चित्रपटातील जुनी नवीन गाणी दाखविले गेले व करा ओफेवर (डॉ. राजवाडे) ठिकाणी सादर केली.

ज्येष्ठ नागरिक विनायक तथा आबा नांदुर्डी कर यांना श्री श्री अ पाटणकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. संघाच्या सदाबहार 2019 वर्षारंभ विशेषकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संघाचे मानंद अध्यक्ष चंद्रशेखर कथा दादा गुजर, अध्यक्ष विठ्ठल कुलकर्णी, सदाशिव देशपांडे, प्रकाश पोरवाल, रमेश दिवेचा, आनंदराव चव्हाण, श्रीरंग दगडे, मुकुंद सांगलीकर, सुरेखा चव्हाण, नीलिमा कुलकर्णी, सुनिता देशपांडे, आशा नलावडे, उषा पायगुडे, प्रमिला पवार, नीना पोरवाल यांनी सर्व कार्यक्रमाचे उत्तम रित्या नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.