PimpleSaudagar : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज -पिंपळे सौदागर येथील जेष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर यांचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ७५ वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठांचा सत्कार, मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्ष्या कुंदा भिसे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जायनाथ काटे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास नगरकर, रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार, सागर बिरारी, ऋषिकेश होने, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेले भास्कर मिस्त्री, ध्रुवकांत भट, मुकुंद द्रविड आणि लक्ष्मण अय्यर यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सर्व जेष्ठ नागरिकांनी मराठी आणि हिंदी गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. तसेच अनेक जेष्टांनी आपल्या जीवनातील यश-अपयशाच्या अनेक पैलूंना उजाळा दिला.

यावेळी इंदू सूर्यवंशी आणि शैला गुजलवार यांनी सूत्रसंचालन केले. तर विलास नगरकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.