Pimpri News : महापालिका शाळांमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये (Pimpri News) संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करावी, अशी मागणी आदर्श शिक्षक चंद्रकात सोनवणे, पत्रकार दत्तात्रय कांबळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  संत गुरु रविदास महाराज हे भारताच्या भक्ती चळवळीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व असून ते भक्ती परंपरेतील एक महान संत मानले जातात. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 5 फेब्रुवारी रोजी जयंती आहे.

PMRDA News : हवेलीतील वडाचीवाडी नगररचना योजना मंजूरीसाठी शासनाकडे

महापालिकेतील सर्व शाळांमध्ये संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात यावी. तसेच त्यांनी केलेल्या अनमोल कार्याचे सर्व शालेय विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. (Pimpri News) या अनुषंगाने निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आयोजन करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. याबाबतचा शासन आदेशही आयुक्तांना दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.