Diwali News : यंदाची दिवाळी साध्या व घरगुती पद्धतीने साजरी करा ; राज्य सरकार 

एमपीसी न्यूज – राज्यात व मोठ्या शहरात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत त्यामुळे, संसर्गाचे धोका लक्षात घेता यंदाची दिवाळी साध्या व घरगुती पद्धतीने साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत त्यामुळे घरातच राहून खबरदारी घेत दिवाळी साजरी करावी असं सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना परिपत्रकात म्हटले आहे. 

यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट कायम असून त्यासंबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दिवाळीतील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच फाटके न फोडता मोठ्या प्रमाणावर दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा असे आवाहन केले आहे.

* काय आहेत मार्गदर्शक सूचना

– उत्सव साध्या व घरगुती पद्धतीने साजरी करावा, याकाळात घरातील जेष्ठ नागरिक व बालके यांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

– नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येणं व गर्दी टाळावी. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे.

– फटाके फोडण्याचे टाळावे त्याऐवजी मोठ्या प्रमाणावर दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.

– दिवाळी पहाट व अन्य सार्वजनिक कार्यक्रम साजरे करु नयेत. करायचे झाल्यास ते ऑनलाईन पध्दतीने साजरे करावेत.

– आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात यावेत. रक्तदान शिबीर आयोजित करावित मात्र, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.