Talegaon Dabhade : तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाकडून 41वा पक्षाचा वर्धापन दिन साजरा

0

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाकडून 41वा पक्षाचा वर्धापन दिन ध्वजारोहण करून उत्साहाने साजरा करण्यात आला.

तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौका मधील तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र माने या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभाडे शहर मुखपत्र अंत्योदय न्युज पोर्टलचे लोकार्पण जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष इंदरशेठ ओसवाल, उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,सरचिटणीस विनायक भेगडे,रविंद्र साबळे,रजनी ठाकूर,नगरसेवक अरुण भेगडे,अमोल शेटे,नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे,प्राची हेंद्रेसह सर्व आघाड्याचे प्रमुख  व पदाधिकारी, कार्यकर्ते,आजी-माजी पदाधिकारी नगरसेवक – नगरसेविका उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment