Bhosari Crime News : रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे तरूणांना भोवले

बड्डे बॉयसह सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गर्दी करून सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे भोसरीतील तरूणांना चांगलेच भोवले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून आरडा ओरडा करत, फटाके फोडून शांतता भंग केल्याप्राकरणी बड्डे बॉयसह सहा जणांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 12) सखुबाई गभाजी गवळी उद्यान, सार्वजनिक रत्यावर हा प्रकार घडला.

अतुल गोकूळ शिंदे (वय 25, रा. खंडोबामाळ, भोसरी), गौरव डफळ (रा. दिघीरोड, भोसरी), संकेत डफळ (रा. दिघीरोड, भोसरी), दादु गव्हाणे (रा. भोसरी), अनिकेत गायकवाड (रा. दिघीरोड, भोसरी), राहुल गाढवे (रा. दिघीरोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक रविंद्र दत्तात्रय जाधव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल शिंदे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वजन तोंडाला मास्क न लावता एकत्र जमले होते. मोटर सायकलवर केक कापून मोठ मोठ्याने आरडाओरडा करत फटाके फोडून परिसरातील शांतता भंग केली. कोरोना संसर्गजन्य आजाराचे नियमाचा भंग केला. दरम्यान, आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.