Talegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- दरवर्षी प्रमाणे तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये 9 वे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उस्ताहात व जोशपूर्ण वातावरणात पार पडले.

“लागीर झालं जी” या मालिकेत भैय्यासाहेब ही महत्त्वाची भूमिका करणारे किरण गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोमाटणे येथील पायोनीअर हॉस्पिटलचे संचालक डॉ.ताराचंद कराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, गणेश भेगडे, दत्तात्रय नाटक, सुनील भेगडे, संतोष भेगडे, रामराव जगदाळे, बी.म.भसे, राहुल गोळे, सुनील गायकवाड, खंडूजी टकले, अरुण भेगडे, अशोक भेगडे, पत्रकार विलास भेगडे, विजय गरुड आदी उपस्थित होते.

प्री-प्रायमरी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारा विविध राज्याचे पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम सादर केले.तसेच विद्यार्थ्यांनी कोळी, बिहू, काश्मिरी,आसामी, गोंधळ, जागरण, बांबू, नृत्य सादर केले. या सर्व कार्यक्रमाला पालकवर्गाचा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पाढे पाठांतर स्पर्धा, उत्कृष्ट विद्यार्थी व उत्कृष्ट शिक्षिका अदिती चितळे, शुभांगी भसे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या लाळे यांनी केले. किरण गायकवाड यांचा सत्कार शाळेचे संस्थापक गणेश भेगडे यांनी केला. सूत्रसंचालन अदिती चितळे, मेघना वीरकर, कोमल मोहिते, शुभांगी भसे, हेमा कोळेकर यानी केले. संतोष भेगडे यांनी आभारप्रदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.