Nigdi : मॉडर्नमध्ये संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आज (मंगळवारी) संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी 1200 विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या भारतीय संविधानाचे वाचन केले.

यावेळी मुख्याध्यापक सतीश गवळी यांनी भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून का साजरा करतात याविषयी माहिती दिली. तर, दुसऱ्या सत्रात इतिहास अभ्यासक श्रावणी कुलकर्णी हिने 26 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांची माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

यामध्ये चित्रफितीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल, ओबेराय बिल्डिंग आदी ठिकाणांवर कसा हल्ला झाला याची माहिती दिली. यावेळी आपल्या शूर मुंबई पोलिसांनी या हल्ल्याची तीव्रता कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या जीवाचे रक्षण करताना विजय साळसकर, हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओंबाळे आदींचा पराक्रम चित्रफितीद्वारे दाखविला. अशा संकटसमयी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहिल्यास मोठा अनर्थ टळू शकतो, असे श्रावणी कुलकर्णी म्हणाली.

यावेळी संस्था उपकार्यवाह शरद इनामदार, सतीश गवळी, राजीव कुटे, अमोल नवलपूरे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके या शिक्षकांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.