Maval : मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमात ज्येष्ठांचा सत्कार करून गुरुपौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज – मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमात ज्येष्ठांचा सत्कार करून गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. संस्थेच्या व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. 

मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमात 90 वर्षांच्या आजी आहेत. त्या मुख्याध्यापिका होत्या. संस्कृती यांनी या आजींना गुरूपौर्णिमा साजरी करण्याबद्दल विचारले असता त्यांनी होकार दिला. त्यानंतर केक आणून ज्येष्ठांच्या हातून कट करण्यात आला. तसेच संस्कृती यांनी त्यांच्या शिक्षकांना देखील आमंत्रित केले होते. यावेळी संस्कृती व त्यांच्या आई मानसी गोडसे यांनी गुलाबाचे फूल व नारळ देऊन ज्येष्ठांचा व शिक्षकांचा सत्कार केला.

याप्रसंगी वर्मा कुटुंबीयांकडून सर्व रूग्णांना पाव भाजी देण्यात आली. वर्मा कुटुंबाने देखील या उपक्रमाचे खूप कौतुक केले. यावेळी ते म्हणाले मुलगा आणी सुन देखील आपल्या एवढी सेवा करीत नाही. अनेक वेळा पैसे घेऊनही कोणी इतकी सेवा करीत नाही. तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुमच्या सेवेला तोड नाही. याबद्दल खरच तुमचे खूप कौतुक आहे. तर संस्कृती म्हणाल्या आपला आनंद नेहमी ईतरांना वाटत चला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.