Talegaon Dabhade : राजधानी रायगडाला प्रदक्षिणा घालत मराठी राजभाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज – शिवशाही ट्रेक परिवारच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास प्रदक्षिणा घालण्यात आली. राजधानीला प्रदक्षिणा घालून मावळ्यांनी मराठी राजभाषा दिन हा अनोख्या पद्धतीने साजरा केला.

पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, असा आपला मराठ्यांचा इतिहास सांगतो. याचीच प्रचिती मराठी राजभाषा दिनानिमित्त राजधानी रायगडावर आली. रायगडच्या प्रदक्षिणा मार्गावर शिवशाही ट्रेक परिवारच्या सदस्यांनी 16.2 किलोमीटरचा डोंगर-दऱ्या, कातळकडे, खिंडी, नदी, नाले आणि ओढ्याच्या काठाने घनदाट वनातून वाट काढत प्रदक्षिणा पूर्ण केली.

संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग व्यवस्थित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. अवघड आणि केवळ अशक्य वाटणाऱ्या सर्व बाबी छत्रपती शिवाजी महाराजांवरील श्रद्धेने आपसूकच पूर्ण होऊन जातात अशा भावना या ट्रेकर्सनी व्यक्त केल्या. या प्रदक्षिणेनंतर राजधानी रायगड किती बेलाग आणी बालिष्ठ आहे हे खऱ्या अर्थाने समजते.

शिवशाही परिवार तर्फे रायगडची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. या सहलीत लहान थोर सर्वांनी यश मिळविले. स्वराज्यातील वासोटा आणि रायगड हे दोन किल्ले सर केल्यानंतर अशक्य असे काही राहत नाही, असे शिवशाही ट्रेक परिवारचे डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.