Rakshabandhan festival : ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये जवानांसोबत राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा

एमपीसी न्यूज : ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये (Rakshabandhan festival) जवानांसोबत रक्षाबंधन व एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव देवकर पथ येथील एम जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूलमध्ये जवानांसोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम भारतीय लष्करातील मेजर मोहन कारंडे व मेजर धनंजय अल्यन यांचे स्वागत शाळेच्या संस्थापिका शांताबाई देवकर व उर्मिला देवकर यांनी केले. त्यानंतर सरस्वती देवकर व आश्विनी द्राक्षे यांनी जवानांचे औक्षण केले. साधना सावंत मॅडमच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून जवानांना मानवंदना दिली. शाळेत भारतीय लष्करातील जवान आल्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. मेजर मोहन कारंडे यांचा सन्मान रामदास देवकर यांच्या हस्ते झाला. तसेच, मेजर धनंजय अल्यन यांचा सन्मान उर्मिला देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने केली दहशतवाद विरोधी शाखेची स्थापना

विद्यार्थ्यांच्या वतीने अनुश्री कुलकर्णी, रुद्रा, सुरभी, सिद्धी या विद्यार्थिनींनी जवानांना राखी बांधली . शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका वंदना देवकर तसेच सरस्वती देवकर यांनी जवानांना राखी बांधली. यानंतर जीवन नाईक, कृष्णा पाटील या विद्यार्थ्यांनी जवानांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सीमेवरील जवानांचे महत्त्व खूप आहे. सीमेवरील जवानांमुळेच आज संपूर्ण देश सुरक्षित आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशवासीयांसाठी जवानांचे योगदान खूप मोठे आहे, असे मनोगत रोशनी पाटील यांनी व्यक्त केले.

मेजर मोहन कारंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे आम्हाला एक प्रकारची ऊर्जा, शक्ती, स्फूर्ती मिळते. देशातील आमच्या भगिनी तसेच देशवासीय आमच्याबरोबर असल्याचे वाटते, अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शेवटी शाळेतर्फे जवानांसाठी 1001 राख्या मेजर मोहन कारंडे व मेजर धनंजय अल्यन यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी (Rakshabandhan festival) सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देवकर, देवकर देवदास, नवनाथ देवकर व महादेव थोरात हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला देवकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.