Khed : वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्थेचा 13 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – विषमतेची पाळेमुळे उपटून टाकायची असल्यास आपल्याला समतेच्या मूल्यांची रुजवन केली पाहिजे त्याला खतपाणी घातले पाहिजे या विचाराने प्रेरीत होऊन काम करणाऱ्या वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेच्या 13 व्या वर्धापन दिना निमित्ताने खेड (Khed)  तालुक्यात दिनांक 21 मे रोजी “समता मेळावा” आयोजित करण्यात आला होता.

Pune : पुण्यातील टिंबर मार्केट मधील जळीत ग्रस्ताना लवकरात लवकर मदतीसाठी प्रशासनाला निर्देश : अजित पवार

या मेळाव्याचा उद्देश अधिकाधिक युवाना समतेच्या तत्वा चे महत्व पटावे व त्यांनी ते अंगीकारुन त्यांच्या जीवनात आनंद मिळवा हे होता. संस्था गेल्या 13 वर्षापासून अविरतपणे वंचित घटकांचे आणि त्यातही त्यांच्यातील तरुण मुलींचे नेतृत्व विकसित व्हावे म्हणून प्रयत्न करत आहे. त्यासाठी संस्थेने गावा गावात युवतीगट स्थापन केले असून त्या माध्यमातून जाबाबदार नागरीक घडविण्याचे काम करत आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे मेळाव्यातील वेगवेगळे स्टॉल होते ज्या माध्यमातून हिंसा होत असल्यास ठामपणे कसा नकार द्यावा, सायबर क्राइम पासून लांब राहून आपली सुरक्षितता कशी वाढविली पाहिजे, स्त्रियांवरील कामाचा बोजा कमी होण्यासाठी काय केले पाहिजे, मानसिक ताण तनावाला बळी पडत असल्यास आपण कसे स्वतःला मदत मिळवून देऊ शकतो, विज्ञानवादी दृष्टिकोण कसा वाढवायचा, मासिक पाळी विषयी शास्त्रीय माहिती, करिअर विषयी मार्गदर्शन आणि मनोरंजनात्मक खेळ होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य प्रशिक्षक, महिला सक्षमीकरणावर काम करणाऱ्या स्त्री अभ्यासक तज्ञ उज्वला मजदेकर मॅडम तसेच पुरोगामी चळवळीत सक्रीय असलेले आणि लोकशाही उत्सवा मध्ये महत्वाची भूमिका घेणारे संयोजक मिलिंद चव्हाण लाभले होते.

कार्यक्रमात डॉक्टर स्नेहा पारधी ही आदिवासी समाजातील परदेशात शिकून आलेली हृदयरोग तज्ञ आणि संस्थेच्या सोबत विद्यार्थी दशेपासून आता एक नामवंत वकित म्हणून कामगिरी करणारी प्रियंका कदम यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुलीना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या उदाहरणावरून स्वावलंबी होण्याचे धडे दिले. माजदेकर व मिलिंद चव्हाण यांनी मुलीना एकजुटीचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सर्व आयोजक या तरुण मुली होत्या ज्या संस्थेशी जोडलेल्या आहेत.

कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी संस्थेचे कार्यकर्ते श्रद्धा, अरुणा, स्वाती, सुरज, दीपाली, सुषमा, संध्या, तृप्ती, शिल्पा, वंदना, आशा, सीमा, माधुरी यांनी पार पाडली तर सूत्र संचालन युवा लीडर काजल, धनश्री, नेहा, समृद्धी यांनी पार पाडले अशी माहिती संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.

Alandi : आळंदी मधील श्री काळ भैरवनाथ मंदिरात गंगा दशहराचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.