Celebration County: सेलिब्रेशन काउंटी देत आहे आपल्या पॉकेटमध्ये बसणारा राइट साइज बंगलो प्लॉट

एमपीसी न्यूज – असावे घरकुल अपुले छान ही प्रत्येकाचीच इच्छा असते. शहरापासून दूर निसर्गरम्य लोकेशनमध्ये एखादा टुमदार बंगला बांधण्याचे आजकाल प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो. मात्र एखाद्या खात्रीच्या विकसकाकडूनच प्लॉट घेणे ही आजकाल काळाची गरज बनली आहे. कारण विकसक खात्रीचा नसेल तर आजकाल  फसवणूक होण्याची मोठी शक्यता असते. आपण यात आपली साठवलेली पुंजी वापरत असतो.  अनेकदा एकच प्लॉट ब-याच जणांना विकलेला असण्याची शक्यता असते. शिवाय लीगल टायटल क्लीअर मिळत नाही. एक किंवा दोन गुंठ्याचे विकसित प्लॉट नसतात. म्हणून लोकांना गुंठेवारीतल्या प्लॉटचा पर्याय निवडावा लागतो.

अनेकदा प्लॉटची जागा योग्य पद्धतीने विकसित केलेली नसते. तेथे कच्चे रस्ते असतात. डांबरीकरण तर फार दूरची गोष्ट असते. प्रकल्पात पिण्याच्या पाण्याची सोय नसते. चुकीच्या पद्धतीने गुंठेवारीमध्ये प्लॉट घेतल्याने बँकेकडून लोन मिळत नाही. आणि हे आधी समजत नाही. त्याचा सर्च रिपोर्ट वगैरे घेतल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर येते. आणि मग होतं काय की आपला पैसा गुंतवून मनाजोगी जागा मिळणे हे स्वप्नच राहते आणि मनस्तापच वाट्याला येतो.  हे सगळं टाळून मावळ परिसरात, खास करुन तळेगावमध्ये एखादा फुल्ली डेव्हलप्ड् NA प्लॉट घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी सेलिब्रेशन काउंटी अशीच एक मस्त योजना घेऊन आले आहे. या प्रकल्पाची सध्याची सर्वात मोठ्ठी आणि आकर्षक योजना म्हणजे लवकर बुक केल्यास आपण घसघशीत अशी चार लाखांची बचत करु शकता. ही ऑफर मर्यादित प्लॉट आणि मर्यादित कालावधीसाठी आहे त्यामुळे जास्त वेळ न दवडता लवकरात लवकर प्लॉट बुक करा आणि सुंदर घराचे स्वप्न साकार करा.

वराळे-तळेगावच्या निसर्गरम्य परिसरात, यशवंतनगरच्या कल्पना सोसायटीच्या पुढे हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुंदर रिव्हर व्ह्यू असलेल्या लोकेशनवर स्वतःचा बंगला साकारण्याचं तुमचं स्वप्न आता सहजतेने पूर्ण होऊ शकतं.

सेलिब्रेशन काउंटी ही एक सुसज्ज-सुरक्षित गेटेड कम्युनिटी आहे. जिथे तुमच्यासाठी आहेत अनेक सुखसुविधा. यामध्ये क्लब हाऊस इनडोअर गेम्स सह, चिल्ड्रन्स प्ले एरिया, गझीबो व पार्टी लॉन, ज्येष्ठ नागरिक कट्टा, फुटबॉल कोर्ट, सीसीटीव्ही सिक्युरिटी, भूमिगत इलेक्ट्रिक कनेक्शन, पाणी कनेक्शन, प्लॉट फेन्सिंग, अंतर्गत पथदिवे, काँक्रिटचे रस्ते पेव्हिंग ब्लॉकसह अशा अनेक सोयीसुविधांचा समावेश असणार आहे.

तसेच सेलिब्रेशन काउंटी आपल्याला देत आहे सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी. या प्रकल्पाचं लोकेशन इतकं मध्यवर्ती आहे की, तळेगाव बस स्टॉप, तळेगाव रेल्वे स्टेशन, सेवाधाम हॉस्पिटल, तळेगाव एमआयडीसी, फ्लोरिटेक पार्क सगळं अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथून आपण 20 मिनिटात लोणावळ्यात तर 40 मिनिटात पुणे युनिव्हर्सिटीला पोहचू शकतो. आणि कामाच्या दृष्टीनेही हिंजवडी आयटी पार्क व चाकण एमआयडीसी 20 ते 30 मिनिटांच्या अंतरावर आहे.

सेलिब्रेशन काउंटी आपली गरज ओळखून आपल्या पॉकेटमध्ये बसणारा प्लॉट आपल्याला उपलब्ध करुन देत आहे. राइट साइज प्लॉट या संकल्पनेवर आधारित अगदी 1000 चौ फुटांपासून प्लॉट इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या बजेटमध्येही सहज बसू शकते.

या प्रकल्पाची डेव्हलपमेंट कागदावर नाही तर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता. तेव्हां आजच भेट द्या आणि नो टेन्शन इन्व्हेस्टमेंट करा.

संपर्क:
सेलिब्रेशन काउंटी
9066778484 / 8585

Location :

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.